एसएमएस पाठवा,आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडा..
मुंबईः सीएमओतील काही झारीतले शुक्राचार्य मुख्यमंत्र्यांशी पत्रकारांचा थेट संवाद होऊ देत नाहीत.त्यामुळं आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसएमएस किंवा ट्टिटरच्या माध्यमाचा उपयोग करावा लागतो.सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईल नंबरवर हजारो एसएमएस करून पत्रकारांचे प्रश्न पुन्हा एकदा त्यांच्या कानावर घातले जाणार आहेत.त्यांच्या ट्टिटरवरून देखील पत्रकार आपल्या संतप्त भावना श्री.फडणवीस यांच्या कानावर घालतील.मुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षांनी पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करावेत यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना देखील एसएमएस पाठवून आणि त्यांच्या ट्टिटरवरून आपलं गार्हाणं त्यांच्याही कानी घातलं जाणार आहे.सर्व पत्रकारांना विनंती आहे की,26 नोव्हेंबर 18 रोजी म्हणजे सोमवारी एसएमएस पाठवून आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचं आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेनं केलं आहे.
 
एसएमएस पाठविण्यासाठी खालील फोन नंबर्स आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ः 9373107881
राधाकृष्ण विखे पाटील ः 9821013853
धनंजय मुंडे ः 9850777777
 
ट्टिटर
देवेद्र फडणवीस @Dev_Fadnavis
राधाकृष्ण विखे पाटील @RadhakrishnaVik
धनंजय मुंडे @dhananjay_munde
 
एसएमएसचा मजकूर ः
पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना,मजिठियाची अंमलबजावणी झालीच पाहिजे..छोटया वृत्तपत्रांना न्याय द्या..अधिस्वीकृतीचे निमय शिथिल करा .. या मागण्यांसाठी आज १०,००० पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत.
पत्रकारांना वारंवार रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे दुःखद आहे साहेब..आता आश्‍वासनं नकोत,अंमलबजावणी हवीय मुख्यमंत्री साहेब.
(खाली आपलं नाव गाव,वृत्तपत्राचं नाव लिहावं )
 
विरोधी पक्ष नेत्यांना पाठवायचा एसएमएस.
पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन,मजिठिया,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न,अधिस्वीकृतीचे प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित करून पत्रकारांना सहकार्य करावे ही विनंती. वरील मागण्यांसाठी राज्यातील १०,००० पत्रकार आज रस्त्यावर उतरले आहेत.
 
(खाली आपलं नाव गाव,वृत्तपत्राचं नाव लिहावं )

4 COMMENTS

 1. आम्ही पत्रकार बांधव आमच्या मागण्या मान्य करा

 2. पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे
  पत्रकारांना पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे
  वृत्तपत्र लहान असो कि मोठा वृत्तपत्र हे वृत्तपत्रचवृत्तपत्रच आसते
  पत्रकार हा लहान असो किंवा मोठा तो पत्रकाराच असतो अधिस्कृती हि झालीच पाहिजे

 3. दैनिक पुण्यनगरी मु.पो.पिंपरखेड ता.शिरूर जि.पुणे
  आम्हाला दिलेली आश्वासने पाळा सर्वच पत्रकारांना टोल फ्री,पेन्शन,प्रत्येक तालुक्यात पत्रकार निवास आदी मागण्या आमच्या मान्य करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here