एबीपी माझावर ” चांदूरकरी ड्रामा “

0
791

एबीपी माझाच्या चर्चेत आज मोठा ड्रामा घडला.विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात नेल्सनने केलेल्या सर्व्हवर चर्चा सुरू होती.चर्चेत कॉग्रेसतर्फे जनार्दन चांदूरकर ,राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे,भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस,शिवसेनेतर्फे दिवाकर रावते चर्चेत सहभागी झाले होते.या पाहणीनुसार महायुतीला 210 जागा मिळतील तर आघाडी दोन आकड्यात गुंडाळली जाईल असा निष्कर्ष निघालेला आहे.ते पाहून कॉग्रेसचे चांदूरकर चांगलेच संतापले आणि ते विविध आरोप करून चॅनलवरील चर्चा सोडून निघून गेले.हा सर्व्हे पक्षपाती आहे,यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे,असा एक ांगी सर्व्हेवर चर्चा म्हणजे लोकशाहीचा खून आहे असे अनेक आरोप करून चांदोरकर निषेध करीत निघून गेले.चांदूरकरांना थांबविण्याचा प्रसन्न जोशी प्रयत्न करीत होते मात्र ते एकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

मुळात अशा पाहण्यांना फार महत्व देण्याची गरज नाही कारण लोकसभेच्या वेळेस भाजपला 280 जागा मिळतील असा अंदाज एकाही पाहणीत व्यक्त केला गेलेला नव्हता.काही मतदार संघ,काही मतदारांचे मतं म्हणजे राज्याची आणि देशाची मतं होत नाहीत.मात्र अशा पाहण्या जनमताचा कौल कोण्या दिशेनं आहे हे दाखविणाऱ्या असतात.तो कल पाहून राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक स्टॅटीजमध्ये काही बदल करणे अपेक्षित असते.त्यामुळं या पाहण्यांचे निष्कर्ष खिलाडू वृत्तीनं घेणं अपेक्षित असतं.पण चांदुरकरांना निष्कर्ष कॉग्रेसच्या विरोधात जात आहेत हे पाहून संयम ठेवता आला नाही.त्रागा करून ते निघून गेले.आपल्याला हे मान्य नाही किंवा कॉग्रसेच्या बाजुनंच कल येणार असं त्यांनी सांगितलं असतं तर समजू शकले असते पण त्यांनी तसं न करता चर्चेवर बहिष्कार टाकला.निषेध करीत ते निघून गेले.

” चर्चेला सुरूवात होण्याअगोदर नल्सनं जो सर्व्हे केला आहे तो कशाच्या आधारावर केला याचंी माहिती द्यायला हवी होती.ज्या 117 मतदार संघात हा सर्व्हे केला गेला आणि ज्या 22000लोकांनी आपलं मत नोदंविलं त्या सर्वांना क ोणते प्रश्न विचारले होते हे सांगायला हवं होतं.ते युतीच्या बाजुने कौल देत असतील तर त्यांना आघाडी सरकारने केलेल्या कोणत्या गोष्टी मान्य नव्हत्या हे ही सांगायला हवं होते.तसे न करता थेड आकड्‌यांवरच चर्चा सुरू केली गेली असा चांदोरकर यांचे म्हणणे होते.” ते चुकीचे नसले तरी ते व्यवस्थित भाषेत ते सांगू शकले असते.सर्व्हे म्ङणजे निकाल नाहीत तरीही हा कौल आपल्या विरोधात जात आहे म्ङणून माध्यमांवर वाट्टेल ते आरोप करून चांदोरकर यांनी अशा पध्दतीनं निघून जाणं योग्य नव्हतं.जो ड्रामा चांदूरकर यांनी केला तो मान्य होणारा नाही.तुम्हाला हवे असलेले कौलच दाखविले पाहिजेत असा आग्रह योग्य नाही.आम्हाला जे अडचणीचे असते त्यावर चर्चा होता कामा नये अशी भूमिका घेणे हे माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे.आपल्याला जे पटत नाही ते माध्यमांनी मांडता कामा नये असाच आघाडीचा आग्रह असतो.असं न करणाऱ्यांचा एक तर निषेध केला जातो किंवा पत्रकाराला फटके दिले जातात चांदूरकर निषेध करीत निघून गेले.आघाडीचा पाय खोलात जात असल्याचंच त्यानी आपल्या वर्तनातून दाखवून दिलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here