एडिटर्स गिल्ड राजदीप यांच्या पाठिशी

0
749

सोशल मिडियावरून भलेही राजदीप सरदेसाई यांच्या विरोधात जोरदार आवाज उठविला जात असला तरी पत्रकार संघटनांनी मात्र खंबीरपणे राजदीप सरदेसाई यांच्या पाठिशी उभं राहण्याचीच भूमिका घेतल्याचे दिसते.एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने आज एक प्रसिध्दीपत्रक काढून राजदीप सरदेसाई यांच्यावरील हल्ल्याचा धिक्कार केला आहे.भिन्न विचाराच्या व्यक्तीला जबरदस्तीनं गप्प करण्याची जमावाची मानसिकता अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे गिल्डने म्हटले आहे.एडिटर्स गिल्ड एवढ्यावरच थांबलेले नाही तर सरकार आणि स्वतः पंतप्रधानांनी घटनेचा निषेध करावा आणि दोषींवर कारवाई करण्याच्यादृष्टीने निर्णय घ्यावा अशीही मागणी केली आङे.
एडिटर्स गिल्ड बरोबरच इंडियन वुमन्स प्रेस कॉर्प्सने देखील राजदीप यांच्यावरील हल्ल्याची निंदा केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here