नवी दिल्ली-माध्यमांपासून अंतर ठेऊन राहण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने काळजी व्यक्त केली आहे.देशातील संपादकांच्या या संघटनेने म्हटले आहे की,माहितीच्या आदान-प्रदानात ठेवले जात असलेले अंतर लोकशाहीच्या हिताचे नाही.त्याच बरोबर एडिटर्स गिल्डने सरकार,मंत्रालय आणि अधिकारी यांच्यांशी माध्यमांना सहज संपर्क साधता येईल अशी व्यवस्था कार्यान्वित करण्याची मागणी देखील गिल्डने केली आहे.
एडिटर्स गिल्डच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात गिल्डने म्हटले आहे की,मोदींनी विदेशी माध्यमांशी ज्या पध्दतीनं चर्चा केली त्याच पध्दतीनं त्यांनी भारतीय माध्यमांशी देखील समन्वय ठेवावा.पंतप्रधान कार्यालयातील मिडिया सेलच्या निर्मितीस लावला जात असलेला विलंब,मंत्री आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यास आणली जात असलेले अडथळयाबद्दल चिंता व्यक्त केली गेली आङे.