एक सल…. मित्राच्या पराभवाची!

0
1036
एक सल…. मित्राच्या पराभवाची!
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक प्रश्‍न विचारला होता ‘मत कुणाला देणार?,विकासाला की,थापेबाजीला?अनेकदा हे मत थापेबाजांनाच जातं.केलेली काम,प्रामाणिकपणा,निष्ठा या गोष्टी गौन ठरतात.हाडाचे कार्यकर्ते,अर्ध्यारात्री पक्षासाठी आणि जनतेसाठी उभे राहाणारेही जेव्हा निवडणुकीत पराभूत होतात तेव्हा मतदारांना नेमकं हवंय तरी काय ? असा प्रश्‍न पडतो.माझे वडवणी येथील मित्र विनायक तथा बप्पा मुळे यांच्याबाबतीत हाच प्रश्‍न मला पडतो आहे.शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला हा तरूण अडल्या-नडलेच्या मदतीला अर्ध्या रात्रीही धावून जातो.
कामं मग ती तहसिलमधील असोत,पोलिसातली असोत की,बाजार समितीतली नाही तर व्यक्तिगत वादाची विनायक मुळे हा वडवणी तालुक्यातला हुकमी एक्का असतो.बप्पांकडं गेलो की,काम फत्ते होणारच हा विश्‍वासही मुळे यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून-कार्यातून लोकांच्या मनात निर्माण केला आहे.त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी ते शिवसेनेकडून उभे होते.केवळ सहा मतांनी पराभूत झाले.फार वाईट वाटलं.कारण ते जिंकणार असं वातावरण होतं.पण ऐनवेळी काय झालं ते कळलंच नाही आणि एक तळमळीचा,प्रामाणिक ,कामावर आणि पक्षावर अपार निष्ठा असलेला कार्यकर्ता पराभूत झाला.विनायक मुळे यांचा हा पराभव जिव्हारी लागणाराच आहे.चांगल्या कार्यकत्यार्ंनाही नैराश्य आणणारा आहे असं मला वाटतं.एक गोष्ट यात मला दिसली.मुंबई जिंंकण्याच्या नादात सेनेने जिल्हा परिषदेत लढणार्‍या पक्षाला अक्षऱशः वार्र्‍यावर सोडलं.उध्दव ठाकरेंना जमलं नाही तरी दुसर्‍या -तिसर्‍या फळीतल्या नेत्यांनी थोडं ग्रामीण भागात लक्ष दिलं असतं तर अनेक शिवसैनिकांवर विनायक मुळे व्हायची वेळ आली नसती.अनेकदा नेते स्वतःपुरतं बघतात,कार्यकर्ते वार्‍यावर सोडले जातात यावेळेस आणि अगदी नगरपालिकेच्या वेळेसही हेच चित्र शिवसेनेच्या बाबतीत घडले.तेव्हाही उध्दव ठाकरे यांच्या काही सभा ग्रामीण भागात झाल्या असत्या तर आणखी काही नगरपालिका नक्कीच पक्षाला मिळाल्या् असत्या.पण कुणी कुणाला सांगावं ? हा प्रश्‍न आहे.ग्रामीण भागात वातावरण शंभर टक्के शिवसेनेला अनुकुल आहे.त्यामुळंच अनेक ठिकाणी पक्षानं जमकदार कामगिरी केली आहे.अर्थात मुंबई सोडून पक्षानं जे यश मिळविलंं आहे ते केवळ शिवसेना या चार अक्षरी जादुई शब्दाच्या जोरावर त्याचं श्रेय कोण्या नेत्याला देण्यात अर्थ नाही.शिवसेना आपलं रक्षण करू शकते ही मुंबईकरांची भावना आहे तर शिवसेना हीच ग्रामीण भागातील गुंडांना-पुंडांना,वेळोवेळी अन्याय कऱणार्‍यांना आव्हान देऊ शकते ही भावना ग्रामीण जनतेची आहे.ही जनभावना कॅश करण्यात पक्ष कमी पडला.विनायक मुळे यांच्यासारखे सहा -दहा- पंधरा मतांनी अनेक शिवसेैनिक पडले .मला वाटतं त्यांच्याकडं थोडं लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती.असो आता या जर-तरला काही अर्थ नाही.पण विनायक मुळे यांच्या रूपानं एक उमदा कार्यकर्ता माझ्याच मतदार संघात पराभूत झाला याची सल मला आहे.आता पाच वर्षे वाट पाहायची म्हणजे मोठा कालखंड असला तरी राजकारणात हे असंच असतं हे समजून पुढील वाटचाल करावी लागेल.निराश होऊन,कुणाला तरी दोष देऊनही उपयोग नाही.व्यक्तिगत स्वरूपात आणि मतदार संघाची जी हानी झाली आहे ती भरून येणारी नसली तरी तुम्ही शिवसैनिक आहात,बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात त्यामुळं तुम्हाला निराश होऊन ,चालणार नाही.पुन्हा पुर्वीच्याच जिद्दीनं कामाला लागावं लागेल.मतदान मिळविणं ही वेगळी कला असली तरी बप्पा तुम्ही लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेले आहे.आज नाही तर उद्या नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल.आमचा फार तुम्हाला उपयोग होत नसला तरी आम्ही नेहमीसाठी तुमच्याबरोबर आहोत कारण तुम्ही एक सच्चे शिवसैनिक आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहात.त्यामुळं पराभवाचं दुःख तुम्हाला जेवढं आहे तेवढीच एका मित्राच्या पराभवाची सल आम्हालाही आहे.
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here