रविवारी वर्ध्यात होतो.पत्रकारांसाठी कार्यशाळा होती.माझं मुख्य भाषण झालं.तास दीड-तास बोललो.नवी माहिती पत्रकारांना मिळाल्यानं ते सारेच अस्वस्थ झाले.पुढील प्रत्येक लढ्यात आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं ग्वाही त्यांनी दिली.कालचा दिवस सत्कारणी लागल्याचं समाधान मिळालं.
एक गोष्ट मात्र खटकली.वर्ध्यात पत्रकार भवन नाही.आम्ही मराठी पत्रकार परिषेदेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावं यासाठी सरकारबरोबर भांडत आहोत.वर्धा जिल्हा ठिकाण असताना तिथं पत्रकार भवन नसावं हे काही पटलं नाही. अर्थात याला सरकारपेक्षा पत्रकार आणि त्यंाच्यातील आपसातील वादच कारणीभूत आहेत असं प्रथमदर्शनी तरी दिसून आलं.पत्रकाराच्या संघटना वर्ध्यात अनेक आहेत.ज्या संघटनेला सरकारनं जागा दिली त्यांच्याकडं निधी नाही.ज्यांनी 18 -20 लाखांचा निधी जमविला त्यांंंंंंच्याकडं जागा नाही.ते सरकारला दुसरी जागा मागताहेत.सरकार एक जागा दिलेली असताना दुसरी देणार नाही.त्यामुळं एकीकडं निधी पडून आङे,दुसरीकडं जागा रिकामी पडलीय.दोन्ही संघटनांचं नातं भारत-पाकिस्तान सारखं.प्रत्येकांचे इगो,हितसंबंघ,स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना यामुळे सारंच रखडलं आहे.ही सारी प्रस्थापित मंडळी.वीस-वीस वर्षे पदं अडवून बसलीत.त्यामुळं नव्यानं येणारे नव्या संघटना काढतात.संघटना वाढताहेत पण वर्धा जिल्हयातील पत्रकाराच्या प्रश्नाला भिडण्याची कोणत्याच संघटनेची तयारी नाही.ग्रामीण भागातील पत्रकाारंांची स्थिती आणखीनच कठीण.त्यांना शहरी भागात राहणारी मंडळी समाज व्यवस्थेतील शेवट्च्या पायरीवरचा घटक समजतात.मी येणार आहे म्हटल्यावर जिल्हयाच्या आठही तालुक्यातील दीडशेच्यावर पत्रकार उपस्थित ङोते.साऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रश्नांसाठी लढलं पाहिजे ही भावना साऱ्यानीच व्यक्त केली.संघटनेच्या चप्पला बाजुला ठेऊन पत्रकारितेच्या व्यापक हितासाठी एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याची भावना उपस्थितांनीही व्यकत केली.मात्र हे केवळ बोलण्यापुरतंच राहता कामानये असं मला वाटतं.ज्यांनी एकत्र येण्यासाठी पहल केली पाहिजे त्यांना ते नको.आम्ही शहरी,आम्ही ग्रामीण आणि श्रमिक आम्ही मालक,आम्ही टीव्हीवाले आम्ही प्रिन्टवाले हे भेद वर्ध्यात अधिक तीीव्रपणे जाणवले.येणाऱ्या तरूण पत्रकारांना हे काही मान्य नाही.साऱ्याच पत्रकारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असताना या उच्चनिचतेच्या भिंती दूर केल्या पाहिजेत अशी तरूण पत्रकारांची सूचना आहे.कालचा मेळावा हा तरूण पत्रकारांच्या याच प्रय़त्नांचा एक भाग होता.कोणाचं नाव घेतलं तर इतर दुखावतील पण साऱ्यंानीच मेळावा यशस्वी कऱण्यासाठी प्रयत्न केले.पत्रकार संागत होते,कित्येक दिवसांनंतर वर्ध्याथ पत्रकारांसाठीचा एक चांगला कार्यक्रम झाला.
कार्यक्रम संपल्यानंतर तरूण पत्रकार खडसे यांनी सेवाग्राम दाखविले.गाधीजींना अभिवादन करून बापू कुटीचे दर्शन घेऊन एक दिवस चांगला गेल्याचं समाधान नक्कीच मिळालं.नंतर अनेक पत्रकाराशी गप्पा मारल्या.पत्रकारितेतील बदल,पेड न्यूज,हल्ले,मजिठिया यासारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली.मजा आली.मला वर्ध्याला बोलावल्याबद्दल संयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.