वाहिन्यांवरील एक चूक देखील अँकरला किती महागात पडू शकते याचा अनुभव सध्या दूरदर्शनची अँकर आयना आहूजा घेत आहे.गोव्यातील चित्रपट महोत्सवाच्या कव्हरेजसाठी पणजीत गेलेल्या आयनाने लाइव्हच्या वेळेस गोव्याच्या गव्हर्नर मृदुला सिन्हा यांचा उल्लेख गव्हर्नर ऑफ इंडिया असा केला होता.याशिवाय फेस्टिवलसाठी आलेल्या पाहुण्यांना काही अप्रस्तुत प्रश्नही आयनाने विचारले होते.यावरून सोशल मिडियावरून आयनाचा प्रचंड टर उडविली गेली.त्यानंतर दूरदर्शनने त्याना परत तर बोलावलेच त्याच बरोबर त्यांच्याबरोबरचा करारही रद्द केला.

24 वर्षीय आयनाने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोशल मिडियावर आपली सुरू असलेली बदनामी पाहून आपल्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही आला होता असे म्हटले आहे.मी चार दिवस काही खाल्ले नाही.माझी अवस्था पाहून धरच्यांनी पोलिसांकडेही माझ्याबद्दल कॉमेंट टाकणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली मात्र लोक हा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड करू लागले.आयना म्हणते.फेस्टिव्हलची दोन तासाच्या कार्यक्रमात केवळ माझी चूक झालेली असलेला दोन मिनिटाचाच व्हिडिओ पोस्ट केला गेला.माझ्याकडून चूक झाली पण मी थोडी नर्व्हस होते.शिवाय टेक्निकल पॉब्रेल होता.

LEAVE A REPLY