एक्स्प्रेस-वे वर 3 ठार,12 जखमी 

0
692

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली गावाजवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार आणि 12 जखमी झाले असून त्यातील सहाजणांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

टेम्पो कर्नाटकातील कामगारांना घेऊन पुण्याहून डोंबिवलीकडे जात असताना टायर्स गरम झाल्याने चालकाने टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा करून तो टायर बदलत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने टेम्पोला जोराची टक्कर दिली त्यात 3 जण जागीच ठार झाले आहेत.अपघातात ठार झालेल्याची ओळख पटली आहे.एक्स्प्रेस वे वर बाजुला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने यापुर्वी देखील अनेक अपघात झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here