एक्स्प्रेस वे वरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार
मुंबईहून येणार्‍या कारने पाठीमागून पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खालापूर फुडमॉलजवळ आज दुपारी हा भीषण अपघात झाला.अपघात एवढा भीषण होता की,कार टँकरवर आदळल्यानंतर कारचा चक्काचूर झाला आहे.या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पनवेल येथील कुमार ओसवाल ,त्यांची पत्नी आणि मुलगी या अपघातात जागीच ठार झाले आहेत.

LEAVE A REPLY