ऋषीची सटकली

0
750

मुंबई-रणधीर कपूर आणि ऋषि कपूर ची पत्रकारांना मारहाण
आर. के.स्टूडियो मध्ये कपूर बंधुची दादागिरी

गणपती विसर्जनच्या वेळेची घटना

प्रतिक्रिया घेणाऱ्या पत्रकारास मारहाण

गणपती विसर्जनादरम्यान कपूर बंधु हातघाईवर

सेल्फी घेणाऱ्या फॅन लाही मारहाण

वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेता ऋषी कपूरने गणपती विसर्जनावेळी एका पत्रकाराला मारहाण केली. ऋषी कपूरने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबईसह देशभरात गणरायाला निरोप देण्यात येत आहे. कपूर घराण्यातील आरके स्टुडिओमधील गणपतीचीही आज विसर्जन मिरवणूक सुरू होती. या विसर्जनाला असंख्य लोकांनी गर्दी केली होती. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर एका पत्रकाराने रणधीर कपूर यांच्या दिशेने जाताच रणधीर कपूर यांनी पत्रकाराच्या दिशेने हातवारे करीत त्याला हुसकावून लावले.

दुसरीकडे ऋषी कपूरच्या एका चाहत्याने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता ऋषी कपूरने त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर गाडीकडे जाताना एकाला ऋषी कपूरने ढकलून दिल्याने तो खाली पडल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत असल्याने कपूर घराण्याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, रणधीर कपूर यांनी याप्रकरणी चॅनेल आणि संबंधित पत्रकाराची माफी मागितली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here