उरणमध्ये आठ लाखांची लूट

0
931

रायगड जिल्हयातील उरण येथील हिंदुस्थान पेट्रोल पंपावरील रक्कम घेऊन ती बॅकेत भरायला जात असलेल्या पंपाच्या दोन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखीट पुड टाकून त्यांना आठ लाख रूपयांना लुटल्याची घटना आज दिवसाढवळ्या घडल्याने उरण परिसरात खळबळ उडाली आहे.
मोटर साईकलवरून जाणाऱ्या पंपाच्या दोन कर्मचाऱ्यांचा पाठलाग करण्यात आला.फुंडे हायस्कूलजवळ ती अडविल्यानंतर सागर गडकरी आणि य़शवंत भोईर यांच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकण्यात आली तसेच त्यांना पिस्तुलाचाही धाक दाखविण्यात आला आणि चोरटे आठ लाख रूपयांची रक्कम घेऊन पसार झाले.या घटनेची नोंद उरण पोलिसांत कऱण्यात आली आहे.उरण आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी हा विषय आता चिंतेचा बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here