उपरती नव्हे पवारांची मजबुरी

0
761

‘बीड लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या घरातील कोणी उभा राहणार असेल तर आपला पक्ष तेथून निवडणूक लढविणार नाही’ असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज जाहीर केलंय.गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी आपण हा निणर्य घेत आहोत असा आभास यातून व्यक्त केला गेलेला आहे.वस्तुस्थिती तशी नाही.बीडच्या जनतेचं गोपीनाथ मुंडे यांच्यावरील असलेलं प्रेम शरद पवार यांना माहिती आहे.मुंडे यांच्या अपघातीनिधनानं तर सारा जिल्हा शोकसागरात बुडून गेला.हे स्वतः पवारांनी अनुभवलंय आणि बधितलं देखील आङे.त्यामुळं निवडणुकात पंकजा मुंडे यांना एकहाती आणि एकगठ्ठा मतं मिळणार हे चाणाक्ष शरद पवार यांना नक्की माहिती आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचा कोणीही उमेदवार उभा राहिला तरी त्याचं डिपाॅझिट बीडमध्ये जप्त होणार .स्वतः शरद पवार उभे राहिले तरी त्यांचीही डाळ बीडमध्ये शिजणार नाही हे ही ते अोळखून आहेत.अशा स्थितीत हात दाखवून अवलक्षण करण्या एेवजी राजकीय दातृत्वाचा आव आणत बीडमधून निवडणूक न लढविणे हेच शहानपणाचे आहे हे शरद पवार यांनी अोळखले आणि त्यांनी बीडमधून निवडणूक न लढण्याची घोषणा केली.त्यांची ही घोषणा म्हणजे त्यांना झालेली उपरती नाही.ती त्यांची मजबुरी आहे हे स्पष्टच आहे,राजकारणात एका एका जागेचं महत्व शरद पवार जाणून आहेत.लोकसभेच्या वेळेस याच बीडच्या जागेसाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत,अशा स्थितीत ते जिंकण्याची शक्यता असती तर त्यांनी बीडवर अशा पध्दतीनं उदक नक्कीच सोडले नसते.पण काहीही केले तरी राष्ट्रवादी बीडमध्ये नक्कीच जिंकणार नाही हे त्यांना माहिती आहे,त्यामुळे शरद पवार यांनी अशी भूमिका घेतलेली आहे.याकडं आपणास दुलर्क्ष करता येणार नाही.
बीड जिल्हयातील अाजची राजकीय स्थिती अशी आहे की,विधानसभेच्या देखील सवर्च्या सवर् जागा भाजपच्या पारड्यात पडणार आहेत.काॅग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्हयात एकही जागा मिळणार नाही असंच आज बोललं जातंय.शरद पवार यांनाही हे अोळखलेलं आहे.त्यामुळं ते आता बीडकडं दुलर्क्ष करणार असंच दिसतंय.त्यांच्या या भूमिकेचा सवार्धिक फटका धनंजय मुंडे यांना बसणार आहे.कारण पवारांच्यादृष्टीनं राजकीयदृष्या आता धनंजय मुंडे यांचंही महत्वही कमीच झालेलं आहे असं नव्हे तर संपलं आहे.त्यामुळं तेही राजकीयदृष्टया पोरके झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here