परिषदेच्या माजी सरचिटणीसाला
अधिकार्याची अर्वाच्चा शिविगाळ
उद्या नांदेडमध्ये पत्रकारांची निदर्शऩे
मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस ,दैनिक एकमतचे नांदेड ब्युरोचीफ चारुदत्त चौधरी यांना काल नांदेड मनपाचे कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांनी अर्वाच्च शिविगाळ केली.एकमतच्या कालच्या अंकात ‘शहरातील आमदारांच्या घरासमोरचे रस्तेच चकाचक अन्यत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे’ अशा आशयाची बातमी प्रसिध्द झाली.ही बातमी आल्यानंतर कदम यांनी चारूदत्त चौधरी यांना फोन करून अत्यंत अश्लिल,अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.या संबंधीची तक्रार काल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी या प्रकाराचा निषेध केला असून उद्या सोमवारी अकरा वाजता मनपासमोर निदर्शने कऱण्याचा निर्णय घेतला आहे.कदम यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी आता पत्रकार संघाने केली आहे.मराठी पत्रकार परिषदेनेही या घटनेचा निषेध केला असून संबंधित अधिकार्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.