उद्याचा बातमीदार ही केवळ वेबसाईट नसून पत्रकारांच्या चळवळीचे ते व्यासपीठ बनले आहे.माध्यमातील प्रत्येक चळवळी,घटना,घडामोडींचे प्रतिबिंब बातमीदारमध्ये उमटत असते.त्यामुळेच बातमीदार ही वेबसाईट पत्रकारितेच्या विश्वात लोक प्रिय झाली आहे.दररोज सरासरी 500 ते 800 पत्रकार आणि पत्रकारितेतर वाचक बातमीदारला भेट देत असतात.मात्र तेवढे पुरेसे नाही.ही चळवळ पुढे चालली पाहिजे,जिवंत राहिली पाहिजे यासाठी अर्थकारणही महत्वाचे असते.बातमीदाराने दोन वर्षे व्यवहारिक विचार कधी केला नाही.मात्र आता गळ्याशी आले आहे.त्यामुळे आम्ही बातमीदारसाठी जाहिरातीच्या स्वरूपात मदतीचे आवाहन करतो आहोत.विविध वृत्तपत्रे,माध्यम विषयक शिक्षण देणा़ऱ्या संस्था,किंवा अन्य व्यक्तींनी जाहिरात देऊन बातमीदारला मदत करावी अशी विनंती आहे.दररोज असंख्य वाचकांपर्यत आम्ही पोहोचत असतानाही जाहिरातीचे दर मात्र माफक ठेवले आहेत.300 * 600 पिक्सलच्या आकारात जाहिरात प्रसिध्द केली जाईल.त्यासाठी केवळ प्रतिमाह 5000 रूपये आकारले जातील. आपणाकडून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा.जाहिरातीसाठी 9850671324 या क्रंमांकावर संपर्क साधता येईल.E-Mail – udyachabatmidar.@gmail.com
संचालक मंडळ
उद्याचा बातमीदार