उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्कारासंबंधी महत्वाचे..

1
963
Trophy on wooden background
महाराष्ट्रातील अनेक तालुका पत्रकार संघ संघटना म्हणून पत्रकारांच्या हिताची कामं तर करीत असतातच त्याच बरोबर सामाजिक उत्तरदायीत्वही ते पार पाडीत असतात.दुदैर्वानं त्यांच्या या कार्याची राज्य पातळीवर पाहिजे तशी दखल घेतली जात नाही.त्यामुळं पत्रकार संघांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात जे काम चालतं ते लोकांपर्यंत जसं येत नाही तसंच असं काम करणार्‍या तालुका संघांचं कौतूकही होत नाही.ही बाब लक्षात आल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेने प्रत्येक महसुल विभागातून एक या प्रमाणे 9 तालुका संघांना ‘वसंत काणे उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ’ या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित कऱण्याचा निर्णय घेतला आहे.नांदेड येथे 25 डिसेंबर 2016 रोजी होणार्‍या मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे.ज्या पत्रकार संघांना असं वाटतं की,आपण करीत असलेलं काम परिषदेने दखल घेण्यासारखं आहे अशा संघांनी आपल्या कार्याची माहिती परिषदेच्या त्या त्या विभागीय सचिवांकडे पाठवावी.विभागीय सचिवांची नावे खालील प्रमाणे आहेत.
पुणे विभाग ः शरद पाबळे 9822083111
नाशिक विभाग ः     मीनाताई मुनोत     9423593224
नागपूर विभाग ः     हेमंत डोर्लीकर         9404127325
अमरावती विभाग ः राजेंद्र काळे             9822593923
कोल्हापूर विभाग ः समीर देशपांडे          9765562895
कोकण विभाग ः     धनश्री पालांडे           9921879660
लातूर विभाग ः       विजय जोशी             9923001823
औरंगाबाद विभाग ः अनिल महाजन        9922999671
मुंबई विभाग ः         हेमंत बिर्जे                 9819714248

1 COMMENT

  1. दैनिक लोकमत बातमीदार सांगली आवृत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here