इंदापूर तालुक्यातील रेडा गावी काल रात्री साडेबारा वाजता दैनिक प्रभातचे पत्रकार निळकंठ मोहिते यांना कॉग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या चमच्यांनी बेदम मारहाण केली.
रेडा हे गाव इंदापूरपासून वीस किलो मीटर अंतरावर आहे.तेथील गुलाब बाबा देवस्थानची सध्या यात्रा सुरू आहे.या यात्रेच्या संदर्भात काही बातम्या मोहिते यांनी छापल्या होत्या.त्याचा राग मनात धरून बातम्या का दिल्यास असा जाब विचारत काल रात्री निळकंठला बेदम मारहाण केली गेली.या प्रकरणी बावडा पोलिस ठाण्यात निळकंठ यांनी तक्रार दिली असली तरी अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.तानाजी देवकर हे देवस्थानचे कारभारी आहेत.
या प्रकऱणाचा पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला असून आज दिवसभरात आरोपींवर कारवाई झाली नाही तर उद्या पत्रकार संघाचे एक शिष्टमंडळ जिल्हा पोलि स अधीक्षकांना भेटेल असा स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या हल्ल्याचा निेषेध केला आहे.