आ. प्रशांत ठाकूर भाजपमध्ये जाणार

0
869
पनवेलमधील क ॉग्रेसचे नेते ,माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपच्या वाटेवर असून त्यांनी आज सायंकाळी मुंबईत रंगशारदामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही
खारघर येथे नव्यानंच उभारण्यात आलेल्या टोलमधून स्थानिक जनतेला माफी द्यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती.मात्र त्यांची ही मागणी मान्य न झाल्यानं नाराज प्रशांत ठाक ूर यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्त केला होता.त्यानंतर ठाकूर पिता-पुत्र भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती.आज उभयतांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या  चचे्रला बळकटी मिळाली आहे.ठाकूर भाजपमध्ये गेल्यास तो रायगड कॉग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here