आले सरकारच्या मना..

0
617

मुंबईत आणखी एक संचालकपद;

 नागपूर,औरंगाबादची उपेक्षा पुढे चालू

 औरंगाबाद येथील माहिती संचालकपद गेली पंधरा वर्षे आणि नागपूर येथील संचालकपद जवळपास पाच वर्षे रिक्त असताना मंत्रालयातील माहिती व जनसंपर्कमध्ये आणखी एक संचालकपद निर्माण केले गेले आहे.काही अधिकार्‍यांची मुंबईतच सोय लावण्यासाठीचा हा प्रयोग असल्याची चर्चा माहिती आणि जनसंपर्कमध्ये जोरात सुरू आहे.सरकारने नव्यापदाचे नामकरण संचालक ( माहिती) (माध्यम समन्वयक ) असे केले असून या पदावर संचालक माहिती ( वत्त ) असलेले शिवाजी मानकर यांची नियुक्ती  केली गेली आहे.मानकर यांच्याकडील वृत्तचा कारभार आता देवेंद्र भुजबळ यांच्याकडे देण्यात आला असून दीर्घकाळ पोस्टिंगच्या प्रतिक्षेत असलेले अजय आंबेकर यांच्याकडे आता माहिती ( प्रशासन )चे संचालकपद दिले गेले आहे.नव्याने निर्माण केलेले संचालक माध्यम समन्वयक यांच्याकडे आता महान्यूज,स्टुडिओ उभारणी,माध्यम विश्‍लेषण केंद्र,सोशल मिडिया,विभागीय संपर्क अधिकारी,डिजिटल बोर्ड योजना,तसेच महासंचालक सोपवतील ती कामे देण्यात आली आहेत.मंत्रालयात संचालक वृत्त हे पद महत्वाचे समजले जाते.बातम्या ,जाहिराती,अधिस्वीकृती,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी आणि पत्रकारांशी संबंधित अन्य योजनांचे काम संचालक वृत्त हे पाहातात.ते काम आता देवेंद्र भुजबळ यांच्याकडे आले आहे.अधिस्वीकृती समितीचे सदस्य सचिव म्हणूनही यापुढे भुजबळ हेच काम पाहणार आहेत.सरकारने  केलेले हे बदल कितपद सुसहय ठरतात हे येता काळच ठरविणार आहे.अधिस्वीकृती समितीचे काम यापुढे तरी किमान निमयांनुसार चालेल अशी अपेक्षा आहे.शिर्डीच्या बैठकीत नियमांना छेद देत अनेक निर्णय घेतले गेले आहेत..अधिस्वीकृतीचे कामकाज सरकारने तयार केलेल्या नियमांनुसारच चालावे एवढीच मागणी आम्ही मध्यंतरी महासंचालकांना भेटून केली होती.त्यांनी ते मान्यही केले होते.औरंगाबादेत येत्या चार तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.त्यावेळी मराठवाडयातील पत्रकार मुखयमंत्र्यांची भेट घेऊन रिक्त संचालकपद भरले जावे अशी मागणी करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here