आरोसला बाळशास्त्रींचे भव्य स्मारक होणार

0
753
महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी आनंदाची बातमी
आरोसला बाळशास्त्रींचे भव्य स्मारक होणार,
 6 जानेवारी 2017 ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
 
मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.सिंधुदर्ग नगरीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं भव्य स्मारक व्हावंं ही परिषदेची आणि परिषदेची संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाची फार जुनी इच्छा होता.त्यासाठी सिंधुदर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक आणि जिल्हयातील अन्य पत्रकारांचा सततचा पाठपुरावा सुरू होता.परिषद देखील त्यासाठी प्रयत्नशील होती.मात्र यश येत नव्हते.पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा करण्याची राजकारण्यांची जुनी सवय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे स्मारकाची मागणी पुढं सरकत नव्हती.सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अखेर  हा विषय मनावर घेतला आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं पाठपुरावा करून स्मारकासाठी  अ र्थसंकल्पात तरतूद  करून घेतली होती.परिषदेचे पदाधिकारी देखील वारंवार हा विषय घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटत होते.मात्र अधिकार्‍यांचा नकारात्मक दृष्टीकोन असल्याने बजेटमध्ये तरतूद होऊनही काम मार्गी लागत नव्हते.त्यामुळं सरकार आपल्याला खेळवत तर नाही ना असा समज सिंधुदुर्गमधील पत्रकारांच्या मनात निर्माण झाला होता.मात्र आज या सर्व शंका दूर झाल्या आहेत.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात बैठक झाली आणि मुनगंटीवर यांनी संबंधित फाईलवर स्वाक्षरी करून बजेटमधील तरतुदीनुसार 50 लाख रुपये जिल्हाधिकार्‍यांकडे हस्तांतरीत करण्याचे आदेशही दिले.एवढेच नव्हे तर भूमीपूजनाचा मुहूर्तही ठरला आहे.येत्या दर्पणदिनी म्हणजे 6 जानेवारी 2017 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे स्मारकाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे ठरले आहे.त्यामुळे 6 जानेवारीचा परिषदेचा मुख्य सोहळा देखील यंदा ओरोस येथेच होणार आहे.यंंदा सहा जानेवारी रोजी राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारानी ओरोसला यावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यानी केले आहे.आजच्या बैठकीस सुधीर मुनंगंटीवार ,पालकमंत्री दीपक केसरकर, परिषदेच्या वतीने विश्‍वस्त किरण नाईक,जिल्हा संघाचे अध्यक्ष गजानन नाईक,परिषद प्रतिनिधी शशी सावंत तसेच जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.
स्मारकासाठी गजानन नाईक आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी जो पाठपुरावा केला त्याला तोड नाही.केवळ आणि केवळ सिंधुदुर्गच्या सर्व पत्रकारांची तीव्र इच्ेछा,प्रयत्न आणि पाठपुरावा यामुळेच मराठी पत्रकारांचे दैवत असलेल्या बाळशास्त्रींचे स्मारक सिंधुदुर्ग नगरीत उभे राहणार आहे.आपणासर्वाना माहितीच आहे की,बाळशास्त्रीची जन्मभूमी सिंधुदुर्गमधील पोभुर्ले आहे.देवगड तालुक्यात असलेल्या या छोटया गावात बाळशास्त्रींचा जन्म झाला.नंतर ते मुंबईला आले आणि त्यानी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.त्यामुळं जिल्हयात त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी जिल्हयातील पत्रकारंची इच्छा होती.ती आता पूर्ण होत आहे.ओरोसच्या मुख्यालय परिसरात भव्य प्लॉट अगोदरच जिल्हा संघाच्या ताब्यात आलेला आहे.त्यामुळे जागा आणि आता नि धी उपलब्ध झाल्याने सारे अडसर दूर झाले आहेत.राज्यातील मराठी पत्रकारांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.पत्रकारितेतील अनेक दिग्गज आणि तज्ञांशी चर्चा करून स्मारक नेमके कसे असावे याचा आराखडा तयार केला जात आहे.पत्रकारांसाठी एक भव्य ग्रंथालय तेथे असावे आणि त्यात जगातील जर्नालिझमशी संबंधित सर्व ग्रंथ उपलब्ध असावेत असाही प्रयत्न आहे,स्मारकाला राज्यातीलच नव्हे तर देशातील पत्रकार भेट देतील अशी या स्मारकाची रचना असणार आहे.
 
 
 
Click here to ReplyReply to all, or Forward
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here