पत्रकाराने वाचविले 300जणांचे प्राण

0
1036

केवळ रिपोर्टिंग करणं एवढंच पत्रकाराचं काम आहे असं समजून चालणारय पत्रकारांची संख्या कमी नाही.मात्र केवळ रिपोर्टिंगच करणं नाही तर गरज असेल तेव्हा लोकांना मदत करणं हे देखील पत्रकाराचं काम आहे या जाणिवेतून काही पत्रकार काम करताना दिसतात.नेटवर्क 18च्या पत्रकार ऱिफत अब्दुल्लाहने जम्मू-काश्मीरमधील प्रळयाच्या केवळ बातम्या आणि फोटोच आपल्या चॅनलला पाठविल्या नाहीत तर गरजू लोकांचे प्राण वाचविण्यासाठी देखील जिवाची पर्वा न करता प्रयत्न केले.अडक लेल्या एका मुलाला पाठीवर घेऊन त्याचे प्राण वाचविणा़ऱ्या ऱिफतचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे.

सोमवार दिनांक 15 सप्टेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अकंात पहिल्या पानावर रिफत अब्दल्लाहच्या कार्याची माहिती देणारी सविस्तर स्टोरी प्रसिध्द झाली आहे.ऱिफतने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता 300जणांचे प्राण वाचविले असे या स्टोरीत म्हटले आहे.पत्रकारांच्या नावानं बोटं मोडण्याची अनेकांना सवय असते.काहीही झाले तरी त्याचं खापर पत्रकारांवर फोडण्याचीही हल्ली फॅशन झाली आहे.मात्र अनेक पत्रकार जिवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत काम करीत असतात याकडं सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं.अशा पध्दतीचं काम करणाऱ्या रिफत आणि अशाच पत्रकारांच आम्हाला नेहमीच कौतूक वाटत असतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here