आब्याचे दर सामांन्यांच्या आवाक्यात
अलिबागच्या बाजारात हापूस आंब्याची आवक वाढल्याने आब्याचे दर आता आवाक्यात आले आहेत.पंधरा दिवसांपुर्वी 800 ते 1400 रूपये डझन असलेले आंब्याचे दर आता 400 ते 900 रूपयांपर्यत खाली आले असल्याने आबा खवय्यांची चंगळ असल्याचे चित्र आहे, आब्याला यंदाही लहरी हवामानाचा फटका बसला.तुडतुडया या कीडरोगांचा प्रादुर्भावही आब्यावर झाल्याने आंबा पिकांत मोठी घट झाली.त्याचा परिणाम आब्याच्या दरवाढीवर झाला.मार्चमध्ये 1400 रूपये पर्यंत म्हणजे सामांन्याच्या आवाक्याच्या बाहेर हे दर होते.मात्र हवेतील पोषक वातावरणामुळे आता मोठ्या प्रमाणावर आंबा तयार झाल्याने आंबा बाजारात येत आहे.नजिकच्या काळात आंब्याची आवक आणखी वाढणार असल्याने दरही खाली येतील असे शेतकरी सांगतात.