आपच्या कार्यकर्त्याचा हल्ला

0
658

आपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पत्रकाराचंी जमकर पिटाई केली.बातमी अमेठीची आहे.अमेठीमधून आपतर्फे कुमार विश्वास मैदानात आहेत.आप आणि कॉ्रगेसच्या कार्यकर्त्यांत मारामारी सुरू असल्याची बातमी समजल्यावर दोन स्थानिक दैनिकाचे छायाचित्रकार घटनास्थळी पोहोचले.तेथे पत्रकार पोहचले तर आपचे कार्येकर्ते कॉग्रेसचा झेंडा लावलेल्या गाडीची तोडफोड करताना त्याची हवा काढताना दिसले.ते दृश्य आपल्या कॅमेेऱ्यात ंबंद करण्याचा प्रय़त्न अजयकुमार मिश्र आणि प्रेवेशकुमार या दोघांवर आपच्या कार्यकत्ेर्यांनी हल्ला केला.त्यांच्याकडचे कॅमेरे काढून घेतले .ही बातमी समजताच अन्य पत्रकारही घटनास्थळी पोहोचले.पोलिसही आली.त्यामुळे आपचे कार्यकर्ते पळून गेले.त्यानंतर दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात पोहोचले.तेथे ज्या पत्रकारावर हल्ला झाला त्यांनी तक्रार दिली.स्वतः कुमार विश्वास यांनी तडजोड करण्याचा प्रय़त्न केला मात्र तो अय़शस्वी झाला.तक्रारीनुसार कुमार विश्वास आणि अन्य पाच जणांच्या विरोधात मारहाण,लूट आण्ि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here