आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक तालुका आणि जिल्हा संघ सामाजिक बांधिलकी जपत लोककल्याणकारी कामं करीत असतात.अगदी बंधारे बांधण्यापासून ते तलावातील गाळ काढून जनतेला पाणी उपलब्ध करून देण्यापर्यंतची विविध पदरी कामं तालुका आणि जिल्हा संघांनी केली आहेत.मिडियातल्या या मंडळीचं कौतूक मिडिया करताना दिसत नाही.आपल्या कामाची कोणी तरी नोंद घ्यावी,आपलं कौतूक करावं असं या मंडळींना वाटणं अगदीच स्वाभाविक आहे.पत्रकारांबद्दलचा एक नकारात्मक स्वर समाजात उमटत असताना पत्रकारांनी केलेल्या अशा सकारात्मक बाबींचं कौतूकही झालं पाहिजे या जाणिवेतून मराठी पत्रकार परिषदेने दोन वर्षांपासून वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार योजना सुरू केली आहे.गेल्या वर्षी या पहिल्याचं पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्व तालुका आणि जिल्हा संघांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.यावर्षी देखील एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.6 जानेवारी 2018 रोजी सिंधुदुर्ग येथे बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कऱण्याचं नियोजन आहे.याच कार्यक्रमात आदर्श तालुका आणि जिल्हा संघांना पुरस्कार दिले जाणार आहेत.यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कॅलेंडरचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार असून परिषदेच्या ध्वजाचं अनावऱणही होणार आहे.

2017 चे आदर्श तालुका आणि जिल्हा पुरस्कार नुकतेच जाहिर झाले आहेत.ते पुढील प्रमाणे आहेत.

रंगाअण्णा वैद्य आदेशी जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार ः बीड जिल्हा पत्रकार संघ

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कर

1) कोकण विभाग   ः      रोहा प्रेस क्लब ( रायगड जिल्हा)

2) पुणे विभाग      ः      पाटण तालुका पत्रकार संघ ( सातारा जिल्हा)

3) नाशिक विभाग  ः    अकोले तालुका पत्रकार संघ ( नगर जिल्हा  )

4) अमरावती विभाग ः   देऊळगाव राजा पत्रकार संघ ) बुलढाणा जिल्हा )

5) नागपूर विभाग   ः      कळमेश्‍वर तालुका पत्रकार संघ ( नागपूर जिल्हा )

6) औरंगाबाद विभाग  ः भोकरदन तालुका पत्रकार संघ ( जालना जिल्हा )

7) लातूर  विभाग  ः       उदगीर तालुका मराठी पत्रकार संघ ( लातूर जिल्हा )

8) कोल्हापूर विभाग ः   आटपाडी तालुका पत्रकार संघ ( सांगली जिल्हा ) 

पुतालुका आणि जिल्हा पत्रकार संघ ही मराठी पत्रकार परिषदेची शक्ती आहेत.राज्यातील 354 तालुके आणि 36 जिल्हे परिषदेबरोबर जोडलेले आहेत.यातील उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या पत्रकार संघांचा सत्कार करताना नक्कीच परिषदेला अत्यंत आनंद होत आहे.रस्कार प्राप्त सर्व तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचे मनापासून अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here