‘वृत्तपत्रांसाठी  वेतन आयोगाची गरजच नाही’ अशी भूमिका टाइम्स ऑफ इंडियाच्या आजच्या अंकात प्रसिध्द झाली आणि आजच रोबो जर्नालिस्टने चीनमधील एका दैनिकासाठी 300 शब्दांचे झक्कास आर्टीकल केवळ तीन सेकंदात लिहिल्याचे वृत्त प्रसिध्द झाले.हा योगायोग असला तरी पुढील काळात पत्रकारांचे काम रोबो जर्नालिस्टकडे सोपविण्याची तयारी मालक वर्गाने चालविली आहे याचे संकेत आता मिळायला लागले आहेत.ब्रिटनमध्ये देखील या दृष्टीने हालचाली चालू असून भारतात ही रोबो जनालिस्टचा प्रवेश फार दूरची गोष्ट नाही.जे आर्टीकल लिहिण्यासाठी एखादया पत्रकाराला तीन तास लागू शकतात ते आर्टीकल रोबो तीन सेकंदात तयार करणार असेल तर व्यवस्थापन नक्कीच हा पर्याय निवडणार असल्याने पत्रकारांनाही या आव्हानाला तोंड देण्यासाठी सिध्द व्हावे लागणार आहे.रोबो रिपोर्टीग करणार आहे,तो उपसंपादकाचे काम करणार आहे आणि पान लावण्याचं म्हणजे पेजीनेशनही करणार आहे आणि ते ही मानवी उपसंपादकापेक्षा कित्येक पटीनं वेगानं आणि अचूकपणे.मजिठियाच्या भीतीने अनेक बडया वृत्तपत्रांनी पत्रकार कपात सुरू केलेली आहे.त्यावर रोबो जर्नालिस्टचा उतारा हे मालक शोधू शकतात हे नक्की.*पत्रकारितेत आता माणसांचे काम उरणार नाही, कमी होणार!*ही गोष्ट आता आपणास मान्य करावी लागणार आहे.

या संबंधिची मूळ बातमी खाली दिली आहे.–

*Robot reporter makes newspaper debut*

Beijing। A robot journalist made its debut in a Chinese daily newspaper on Wednesday with a 300 characters long article written in just a second, scientists say.

The article was focused on the Spring Festival travel rush.

Its author, Xiao Nan, took only a second to finish writing the piece and is able to write both short stories and longer reports, according to Wan Xiaojun, a professor at Peking University who leads the team studying and developing such robots.

“When compared with the staff reporters, Xiao Nan has a stronger data analysis capacity and is quicker at writing stories,” he said.

“But it does not mean intelligent robots will soon be able to completely replace reporters,” Xiaojun was quoted as saying by ‘China Daily’.

At present, robots are unable to conduct face-to-face interviews, cannot respond intuitively with follow-up questions and do not have the ability to select the news angle from an interview or conversation, Xiaojun said.

“But robots will be able to act as a supplement, helping newspapers and related media, as well as editors and reporters,” he said.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here