आता मतदाार रोको

0
702

शाळा,कॉलेजसना लागलेल्या सुट्या आणि लगिन सराईमुळे रायगडातील अनेक कुटुंब आपल्या मूळ गावी जाऊ लागल्यानं त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल अशी शक्यता आहे.

.रायगड जिल्हयात कामाच्या निमित्तानं मराठवाडा,सांगली ,सातारा,जळगाव,कोल्हापूर पुणे,धुळे आदि भागाबरोबरच बिहार आणि उत्तर प्रदेशातूनही अनेकजण आलेले आहेत.मात्र सुट्‌ट्या लागल्याने अनेक जण आपल्या मुळ गावी जाऊ लागल्याने साऱ्याच राजकीय पक्षांना धडकी भरली आहे.रायगडमधील जे स्थानिक आहेत तेही पर्यटनासाठी बाहेर पडू लागले असल्यानं या मतदारांना थांबवायचं कसं हा प्रश्न आता सर्वच राजकीय पक्षांसमोर निर्माण झाला आहे.रायगडातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ट्रॅव्हल एजन्ट सांगतात. रायगड मतदार संघात पुढील गुरूवारी म्हणजे 24 एप्रिल रोजी मतदान होत आहे.
दरम्यान सुट्टया लागल्याने रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्ेयतही मोठी वाढ झाली असून जिल्हयातील सर्व समुद्र किनारे गर्दीने फुलुन गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here