पत्रकारांवर हल्ले झाले,पत्रकारांना खोटया गुन्हयात अडकविले गेले,पत्रकार ज्या वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर काम करतात त्या माध्यम समुहाच्या मालकांवर दबाव आणून अनेक पत्रकारांना रस्त्यावर आणून झाले,पत्रकारांच्या विरोधात मोहिम सुरू करून एखादे वर्तमानपत्र वाचू नका किंवा वाहिनी पाहू नका असेही फतवे काढले गेले,हे सारं परवडलं पण आता पत्रकारांना ब्लॅकमेल करण्याचा नवा प्रकार समोर आला असून तो भयंकरच नाही तर पत्रकाराला जीवनातून उठविणारा आहे.रमेश झंवर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत,व्यवस्थेच्याविरोधात परखड भाष्य करणारे,चालू घडामोडींचं रोखठोक विश्‍लेषण करणारे त्यांचे लेख वाचनीयच नाही तर संग्राहयही असतात.त्यांच्या फेसबुक वॉलवरील काही फोटो,मेसेंजर आणि गुगलवरील फोटो कॅ्राप करून त्यांचे लैगिक संबंध दाखविणारा एक व्हिडीओ तयार करून रमेश झंवर यांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे.रमेश झंवर यांनी आपल्या फेसबुक वॉलवर यासंबंधीची माहिती दिली आहे.ते म्हणतात,’मला लैगिक प्रकरणात अडवकवणारा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने किंवा काही व्यक्तींनी तयार केला असून मी त्याला 999 डॉलर बिटकॉईन चलनाव्दारे नाही दिले तर माझ्यावर तयार करण्यात आलेला तो बनावट व्हिडिओ माझ्याशी संबंधित सर्वांना पाठविण्यात येईल.या संबंधिचा एक इमेल आज मला आला आहे’..रमेश झंवर यांना Rzawar <y@eleulzic.com>  या मेल आयडीवरून तो मेल आला आहे.झंवर यांना पुढं अशीही धमकी दिली गेली आहे की,’तुम्ही पोलिसांकडं गेलात तरी मी कोण आहे याचा पत्ता तुम्हाला लागणार नाही.पोलीस माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत.तुमच्याकडून 999 डॉलर मिळाले नाहीत तर हा लैगिक व्हिडिओ प्रकाशित करून तो तुमच्याशी संबंधित सर्वांना पाठविण्यात येईल’.झंवर यांचा मसेंजर एका सॉफ्टवअरच्या साह्याने उघडला.त्यावरूनच झंवर यांच्याशी संबंधित माहिती,फोटो,इमेल पत्ता मिळविला आणि ब्लॅकमेल सुरू केले.एखाद्याची माहिती चोरण्यासाठी याच सॉफ्टवेअरचा वापर केला जातो म्हणे..
पत्रकाराचे अनेक शत्रू असतात.आपल्या लेखणीमुळं कोण कसे आणि केव्हा दुखावेल याचा नेम नसतो.वरकरणी हे पैश्यासाठीचे ब्लॅकमेलिंग वाटत असले तरी त्यामागे इतर काही कारणं नसतीलच असा दावा करता येणार नाही.सरकारनं या इमेलची चौकशी करून यामागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे अशी आमची सरकारकडं मागणी आहे.पत्रकारांचे मोबाईल,लॅपटॉपमध्ये अनेक प्रकराची गुप्त माहिती तसेच फोटोही असतात.अशा सॉफ्टवेअरचा वापर करून जर पत्रकारांच्या मेसेंजरची कुलपं तोडली जाऊ लागली तर मग पत्रकारांना काम करणे अवघड होईल.त्यामुळंच या प्रकरणाकडं सरकारनं गांभीर्यानं पहावं आणि पूर्ण प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत आहे.या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here