आता चित्रमय संघर्ष…

0
771

कथा एका संघर्षाची या पुस्तकाचे प्रकाशन

पत्रकार संरक्षण कायद्यासाठीची लढाई तब्बल बारा वर्षे लढली जात होती.हा लढा लढताना अनेक चढ-उतार आले.आशा निराशेच्या हिंदोळयावर हेलकावे खाणारी ही चळवळ राज्यातील पत्रकारांचा अंत पाहणारी होती.या बारा वर्षाच्या लढयातील अनेक गोष्टींची माहिती देणारे कथा एका संघर्षाची या पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमध्ये मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.–

कथा एका संघर्षाची या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहून बारा वर्षाच्या या ऐतिहासिक लढयाचा चित्रमय प्रवास राज्यातील पत्रकारांना आणि सामांन्य वाचकांना अनुभवता यावा यासाठी चित्रमय संघर्ष हे पुस्तक परिषदेच्या अधिवेशनात प्रकाशित केले जाणार आहे.यामध्ये लढ्याची केवळ छायाचित्रे आणि त्याखाली कॅप्शन असतील.बारा वर्षाचा हा लढा राज्याच्या वेगवेगळ्या भागात ,प्रत्येक जिल्हयात लढला गेला.प्रत्येक जिल्हयातून ही छायाचित्रे मागवून त्यांचा पुस्तकात समावेश केला जाणार आहे.हे पुस्तकही एक ऐतिहासिक दस्ताऐवज ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here