आज आणखी एक पत्रकार खोटया गुन्हयाचा बळी ठरला आहे.प्रकरण सातार्यातील आहे.येथील न्यूज 24 वाहिनीचे प्रतिनिधी रोहित भुतकर यांनी एक स्टोरी कऱण्यासाठी माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला.याची खबर संबंधितास लागल्यानंतर अचानक एका महिलेने भुतकर यांच्यावर 354 कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा काल रात्री दाखल झाला आहे.गंमत अशी की,दोन दिवसांपुर्वीच भुतकर यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. असा तक्रार अर्ज पोलिसांना दिला होता. पत्रकाराला खोट्या गुन्हयात अडकवून त्याचा आवाज बंद कऱण्याची गेल्या आठ महिन्यातलही ही राज्यातील 33 वी घटना आहे.खोटे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या प्रकाराच्या विरोधात 2 ऑकटोबर रोजी राज्यात सर्वत्र पत्रकार मुक मोर्चे काढत आहेत.