बातमी धक्कादायक आहे.काही दिवसांपूर्वी भूकबळी गेलेल्या मध्यप्रदेशमधील एका पत्रकारावर चंदा जमा करून अंत्यसंस्कार केल्याची बातमी येथेच दिली होती.आता उत्तर प्रदेशमधून पुन्हा अशीच बातमी आली आहे.लखनौस्थित पत्रकार शिव आसरे अस्थाना यांचा 14 तारखेला ब्रेन हॅब्रेजने मृत्यू झाला.मात्र त्यांच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते त्यामुळे पत्रकारांनीच कोणी हजार,कोणी दोन हजार रूपये दिले आणि अस्थाना यांच्यावर अत्यंसस्कार केले गेले.

अस्थाना दोन नियतकालिकाचे संपादक होते.तरीही त्यांची घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.देशातील असंख्य पत्रकार आज याच अवस्थेतून जात आहेत.जी मंडळी पत्रकारांच्या नावाने गळे काढते अशांनी कधी तरी पत्रकारांच्या वास्तव आयुष्याची कधी विचारपूस केलीय काय हा प्रश्न नेहमीच पडतो.

LEAVE A REPLY