आणखी एका पत्रकाराचे अकाली निधन

0
981

आणखी एका तरूण पत्रकाराचे अकाली निधन झाले.अनिल कुलकर्णी हे सामनाचे पिंपर-चिंचवडचे पत्रकार.कालपर्यंत सारं काही व्यवस्थित सुरू होतं.आज सकाळी अ‍ॅटॅक आला आणि सारं काही संपून गेलं.वय 38 वर्षाचं.हे काय असं अवचित निघून जायचं वय झालं?.परंतू अनिल कुलकर्णी अकाली गेले. या वर्षात अशा पाच-सहा घटना घडल्या आहेत.प्रकृत्तीची हेळसांड,कामाचे ताण-तणाव,अवेळी जेवण,जाग्रणं ,या सार्‍याचा परिणाम पत्रकाराच्या आरोग्यावर होत असतो.त्यातून अशा घटना घडतात.हे थांबायचं तर किमान वर्षातून एकदा शरीराची तपासणी झाली पाहिजे.त्यासाठीच मराठी पत्रकार परिषदेने दरवर्षी 3 डिसेंबरला महाराष्ट्रात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्याचं नक्की केलं आहे.यंदाही ही शिबिरं राज्यभर झाली आहेत.खरं म्हणजे पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं ही व्यापक चळवळ बनली पाहिजे.त्याची गरज आहे.परिषदेने मुंबईत पत्रकार आरोग्य सेवा कक्ष सुरू केला आहे.त्यामागेही पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचाच उद्देश आहे.अनिल कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धाजली.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here