आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद

0
809

टोकियो : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. आयएसआयएसने ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा शिच्छेद केल्याचा हा व्हिडिओ आहे. जपानी पत्रकार केंजी गोटो असे या पत्रकाराचे नाव आहे. मिलिटेंट य वेबसाईटवर हा व्हिडिओ  जारी जारी करण्यात आला आहे.

 केंजी गोटो यांनी आतापर्यंत पाच पुस्तकांचे लेखन केले आहे. टेलिव्हिजन कॅमेरामन म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. पत्रकारितेतील त्यांचा अनुभव मोठा होता.

 केंजी गोटो यांच्या हत्येनंतर जपानसह जगभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे. जपानचे पंतप्रधान शिन्जे अॅबे यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

 पत्रकार केंजी गोटो यांच्या शिरच्छेदाचा 67 सेकंदांचा व्हिडिओ शनिवारी जारी करण्यात आला. ज्यामध्ये गोटो यांना गुडघ्यावर उभे करुन त्यांच्यामागे आयएसआयएसचा दहशतवादी उभा होता. आयएसआयएसच्या दहशतवाद्याने दिलेला सेंदेश हा अस्खलित इंग्रजीत आहे. शिवाय पंतप्रधान शिन्जो अॅबे यांनी केंजी गोटो यांच्या हत्येला जबाबदार धरले आहे. जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबे यांनी इराक, सिरियात जपानी सैनिक वाढवण्याची घोषणा केली होती, त्याचबरोबर आयएसआयएसविरोधातील लढ्यासाठी 200 दशलक्ष डॉलरची मदतही जाहीर केली होती. या सर्व गोष्टींचा राग आयएसआयएसने काढला असावा, असे बोलले जाते आहे.

 दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. केंजो गोटो यांची हत्या निर्घृण असल्याचे ओबामा म्हटले आहे. गोटो हे साहसी पत्रकार होते. आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी जपान, आखाती देशांसह सर्व देशांनी एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here