आणखी एका तरूण पत्रकाराचं अकाली निधन

0
800

आणखी एका तरूण पत्रकाराचं अकाली निधन
आणखी एक तरूण पत्रकार आपणास सोडून गेला.ताण-तणाव,धावपळ आणि प्रकृत्तीकडं होणारं दुर्लक्ष याचा फटका बीड जिल्हयातील आष्टी येथील तरूण पत्रकार बबन पगारे यांना बसला आणि ते आज पहाटे आपणास सोडून गेले.रात्री झोपताना सारं काही व्यवस्थित होतं.पहाटे तीनच्या सुमारास छातीत दुखायला लागलं आणि उपचार मिळेपर्यंत सारं संपलं.श्रध्दांजली अर्पण करण्याशिवाय आपल्या हाती काही उरलं नाही.बबन पगारे हे आष्टी येथील पार्श्‍वभूमी दैनिकाचे प्रतिनिधी.मध्यंतरी पत्रकार संरक्षण कायदा झाला तेव्हा आष्टीवरून बीडला जाताना भेट झाली होती.आज त्यांच्या निधनाच्या बातमीनं सकाळ उजाडली.शांत,सुस्वभावी अशी ओळख असलेले बबन पगारे,सामाजिक बांधिलकी जपणारे,सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार होते.नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.तालुक्यात चांगला जनसंपर्क असलेल्या बबन पगारे यांना लोकांच्या प्रश्‍नांची चांगलीच जाणीव होती.आपल्या लेखणीतून त्यांनी तालुक्यातील प्रश्‍न ठळकपणे मांडले.मात्र सर्वच पत्रकाराचं होतं तसं,प्रकृत्तीकडं दुर्लक्ष झालं आणि मृत्यूनं अवचित घाला घातला.बबन पगारे यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा तसेच एक मुलगी असा परिवार आहे.दोन्ही मुलं लहान असून ते शिक्षण घेत आङेत..मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने बबन पगारे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here