नेरळ-माथेरान हा 21 किलो मिटरचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून त्यासाठी सातत्यानं नव-नवे बदल केले जात आहेत.माथेरानच्या राणीला लवकरच अत्याधुनिक विस्टाडोम कोच बसविण्यात येणार असल्याने सभोवतालच्या निसर्गाचा आनंद लुटत पर्यटकांना दोन तासांचा हा प्रवास करता येईलविस्टाडोम कोच काचेच्या मोठ्या खिडक्या तसेच छत देखील पारदर्शक असणार आहे.रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या योजनेला नुकताच हिरवा कंदिल दाखविला आहे.माथेरानच्या राणीला सातत्यानं होणारे अपघात ही देखील रेल्वेची मोठी डोकेदुखी आहे.त्यावरही आता उपाय शोधले जात असून अपघात नेमके कश्यामुळं होतात याचा शोध घेण्यासाठी रेल्वे इंजिन आणि प्रत्येक बोगीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले आहेत.त्यामुळं प्रवासादरम्यान नेमके काय होते हे रेल्वेला समजणार आहे.चालक रेल्वेच्या वेगाचे नियम पाळत नाही किंवा रेल्वे रूळ बदलले गेले नसल्याने हे अपघात होतात असं बोललं जातं नव्या व्यवस्थेमुळं अपघाताचं नेमकं कारण शोधता येणार आहे.मध्ये रेल्वेने यापुर्वीच वाफेच्या इंजिनच्या जागेवर डिझेल इंजिन आणले आहे,मानवी ब्रेकवर चालणारी प्रणाली बदलून त्याजागी एअर ब्रेक प्रणाली विकसित केलेली आहे..आता विस्टाडोम बसविले जात असल्याने माथेरानला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत नक्कीच लक्षणीय वाढ होईल असा विश्‍वास रेल्वेला वाटतो..माथेरानकरांनी नव्या बदलांचं स्वागत केलं आहे.शोभना देशमुख माथेरान-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here