आणखी एका अँकरला चूक भोवली

0
715

नवी दिल्ली- या दूरदर्शनला काय झालंय कळत नाही.चीनच्या अध्यक्षांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केल्याने एका ऍकरला आपली नोकरी गमवावी लागली.ही घटना ताजी असतानाच आणखी एका अँकरला असाच चुकीचा उल्लेख भोवल्याचं समोर आलंय.
जम्मू-काश्मीर मधील अनंतनागला फुटीरतावादी शक्ती इस्लामाबाद म्हणतात तर शंकराचार्य हिल्सला कोह ए सुलेमान म्हणतात.ही भाषा फुटीरतावादी म्हणत असले तरी ती सरकारी माध्यम असलेलय दूरदर्शनने वापरणे योग्य नाही.एका अँकरला त्याचं भान राहिलं नाही.तो अतिरेक्यांची भाषा बोलत राहिला.एवढंच नाही तर दोन दिवस रेकॉर्डेट रिपोर्ट दाखविला जात होता.,सोशल मिडियावर याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्या अँकर-कम रिपोर्टरला आता दुसरी असाइनमेंट दिली गेलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here