आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

0
742

आपल्या विविध मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडं सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केलं आहे.अधिवेशनाच्या वेळेस न विसरता अंगणवाडी सेविका मुंबईत येतात,आंदोलन करतात.यावेळी देखील मोठ्या संख्येनं सेविका आझाद मैदानावर आल्या होत्या.आझाद मैदानावरच्या आंदोलनाची दखल घेण्याची पृथा केव्हाच संपुष्टात आली आहे.दिवसभर घसे कोरडे करून झाल्यावर निवेदन पोलिसांच्या हवाली करून कार्यकर्ते गावाकडं निघून जातात.हा सिरस्ता झाला आहे.अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचीही कोणी दखल घेतली नाही.नगर जिल्हयातील महालगावच्या 46 वर्षीय अंगणवाडी सेविका आशा पवार परवा रात्री मुंबईत आल्या.सीएसटी परिसरात उपाशीपोटीच त्यांनी रात्र काढली.सकाळी नाश्ता करून त्या आझाद मैदानावर आल्या.मात्र उन्हाळा,तणाव,आणि अर्धपोटी अवस्थेत असलेल्या आशा पवार याचं निधन झालं आहे.पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी तेवढीच संतापजनक घटना आहे.

सनदशीर मार्गाने जे घटक आंदोलनं करतात,किंवा ज्या घटकांची उपद्रव क्षमता कमी आहे अशा घटकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याची पध्दत महाराष्ट्रात आहे.बॅेक कर्मचारी असतील,रिक्षाावाले असतील,शिक्षक असतील किंवा मुंबई लोकलचे मोटरमन असतील,ज्यांच्या मुळे व्यवस्था विस्कळीत होऊ शकते त्यंाच्या मागण्याची सरकारला दखल घेण्याशिवाय मार्ग नसतो.अंगणवाडी सेविकांमुळे असे काहीच होत नसल्याने त्यांच्या मागण्यांची सरकार सातत्यानं उपेक्षा करताना दिसतंय.
सनदशीर मार्गाने चालणाऱ्या सर्वच चळवळी मोडीत काढण्याचं धोरण साऱ्याच सरकारचं असतं.चळवळीचंी उपेक्षा केली की,थकून चळवळीचे कार्यकर्ते गप्प बसून राहतात.सुरूवातीचा उत्साह राहात नाही.हा नेहमीचा अनुभव असल्याने सरकार उपेक्षास्त्र नेहमीच वापरत असते.अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत हेच दिसून आलंंंंय.पण सरकारचं हे धोरण चुकीचं आणि सामान्यांवर अन्याय कऱणारं असल्यानं त्याबद्दल खेद व्यक्त झालाच पाहिजे.आझाद मैदानावर लोक येतात ते आपली गाऱ्हाणी घेऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष कऱणे हे सरकारकडे आता संवेदनशीलता शिल्लक राहिली नसल्याचे निदर्शक मानले पाहिजे.आशा पवार यांच्या बलिदानानंतर तरी सरकारनं अंगणवाडी सेविकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here