आज श्रध्दांजली सभा

0
429

श्रध्दांजली सभा
!
महाराष्ट्रात 132 पत्रकारांचे कोरोनाने बळी गेले.. पत्रकारांच्या बळी गेलेल्या नातेवाईकांच्या संख्या 200 पेक्षा जास्त आहे.. काहींच्या घरातील दोन-दोन, तीन-तीन माणसं मृत्युमुखी पडली.. अनेक संसार रस्त्यावर आले.. हे सारं अलहाय्यपणे बघत बसण्याशिवाय हाती काही उरलं नाही.. कारण सरकारनं दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना आणि जिवंत पत्रकारांना वारयावर सोडलंय.. साधी लस देण्याची मागणी देखील सरकार पूर्ण करीत नाही.. सारंच द:खद आहे..
गेल्या नऊ महिन्यात जे पत्रकार मित्र आपल्याला सोडून गेले आहेत त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्याचा ऑनलाईन कार्यक़म रविवार दिनांक 23 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केला गेला आहे.. सायंकाळी 6 वाजता ही श्रध्दांजली सभा गुगल मिट वर सुरू होईल.. तीचं थेट प्रक्षेपण फेसबुकवर केलं जाईल.. जे मित्र फेसबुक ला जॉइन होतील त्यांनी सभेतील वक्त्यांची भाषणं एेकता येतील .. श्रध्दांजली सभेत परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष यांच्यासह राज्यातील काही मान्यवर पत्रकार सहभागी होतील..

6 वाजून 5 मिनिटांनी राज्यातील सर्व पत्रकार जेथे असतील तेथे 2 मिनिटे उभे राहून आपल्या दिवंगत मित्रांना श्रध्दांजली अर्पण करतील..

जे गेले ते आपले जवळचे मित्र होते हे लक्षात घेऊन या श्रद्धांजली सभेत राज्यातील तमाम पत्रकारांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे..
मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे या श्रध्दांजली सभेचं सूत्रसंचालन करतील..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here