आजपासून अलिबाग महोत्सव

0
803

रायगड जिल्हयातील महत्वाची अलिबाग नगरपालिका आपला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून त्यानिमित्त आजपासून 29 डिसेंबरपर्यत विविध कार्यक्रमांचं आयोजन कऱण्यात आलं आहे.आज सायंकाळी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्धघाटन होत आहे तर 29 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महात्सवाचाा सांगता समारोप आयोजित केला गेला आहे अशी माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.

कुलाबा जिल्हयाची निर्मिती 1869मध्ये झाली असली तरी त्या अगोदरच म्हणजे 1952 मध्ये पनवेल नगरपालिका अस्तित्वात आली होती.त्यानंतर मे 1964 मध्ये अलिबाग नगरपालिका अस्तित्त्वात आली.नंतरच्या काळात पेण,रोहा,महाड,माथेरान नगरपालिका अस्तित्तवात आल्या. 1991च्या जनगणनेनुसार 1.81 चौरस किलो मिटरचं क्षेत्रफळ असलेल्या अलिबाग नगरपालिक ेचे 1893-94 चे उत्पन्न केवळ 9161तर खर्च 9270 एवढा होता.आज अलिबाग नगरपालिकेचं बजेट काही कोटीत गेलं आहे. रामनाथ हे अष्टागरातलं मुळ गाव.त्यानंतर परिसरातील अली नामक एका धनाड्य व्यापाऱ्याने आपल्या नारळीच्या बागांतील जमिनीवर नवे शहर वसविण्यास परवानगी दिल्यानंतर साधारणतः 315 वर्षांपूर्वी अलिबाग उभं राहिलं.अलिच्या बागेत उभं राहिलेलं शहर म्हणून गावाचं नाव अलिबाग अस पडलं.अलिबाग आज रायगडच्या राजधानीचं शहर असून राज्यातील महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणून सुपरिचित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here