Thursday, May 13, 2021

पत्रकारांवर हल्ले- आकडेवारी बघा,,विचार करा..

भ्रष्टाचार उघडकीस आणला किंवा माफियाच्या कारवायांचा पर्दाफास केला अथवा राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हितसंबंध दुखावतील अशा बातम्या दिल्या  की, — होतात,प्रसंगी हत्या होतात.जगभर अशा हल्ल्याची संख्या वाढत चालली आहे.या बाबतीत जगातील 180 देशांत भारताचा 136 वा क्रमांक आहे. म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे याचा आपण विचार करू शकतो.पत्रकारांवरीलवाढत्या घटनांबद्दल एडिटर्स गिल्ड असेल किंवा प्रेस क्लब ऑफ इंडिया असेल  या पत्रकारांच्या प्रमुख संघटनांनी  चिंता व्यकतकेली असून पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका आता बहुतेक संघटनांनी घेतली आहे.महाराष्ट्रात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली पाच वर्षे पत्रकारांना संरक्षण मिळाले पाहिजे ही चळवळ घेऊन लढते आहे समितीची मागणी आता देशपातळीवर मान्य होत आहे. भारतात अनेक पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.त्यातील महत्वाच्या 15  धटनांची यादी खाली दिली आहे.आजच्या हिंदुस्थान टाम्सनं जर्नालिस्ट इन  डेंजर या मथळ्याखाली जवळपास अर्धापान स्टोरी केली आहे.हिंदुस्थान टाइम्सला मनापासून धन्यवाद.बातमीत माझाही कोट आहे.पुर्वी पत्रकारांवरील हल्ल्याच्या बातम्या दिल्या जात नसत.आता वाहिन्या आणि वर्तमानपत्रंही अगदी गावातील घटनांची दखल घ्यायला लागले आहेत,त्यावर अग्रलेख स्फुट लिहायला लागले आहेत,वाहिन्यांवरून चर्चा व्हायला लागल्या आहेत ही पत्रकार हल्ला विरोधी कृती  समितीच्या चळवळीची फलश्रूती  आहे म्हटलं तर कोणाला वाईट वाटू नये

1 एप्रिल           2008   महंमद मुस्लिमुद्दीन  आसाम

11 मे               2008  अशोक सोधी जम्मू-काश्मीर

13 ऑगस्ट      2008   जावेद अहमद चॅनल -9 श्रीनगर

25  नोव्हेंबर    2008   विकास रंजन,हिंदुस्थान,बिहार

20 जुलै          2010   विजय प्रतापसिंग इंडियन एक्स्प्रेस ,अलहाबाद युपी

11 जून            2011  जेडे मिड डे मुंबई,महाराष्ट्र

1मार्च              2012   राजेश मिश्रा,मिडिया राज,मध्यप्रदेश

23 डिसेंबर     2012  द्वाजामणीसिंग प्राईमन्यूज मनिपूर

20 ऑगस्ट    2013  नरेंद्र दाभोळकर,साधना पुणे महाराष्ट्र

7 सप्टेंबर       2013  राजेश वर्मा,आबीएन -7,युपी

6 डिसेंबर        2013  साई रेड्डी,देशबंधू छत्तीसगढ

27 मे            2014  तरूण कुमार,आचार्य कनक टीव्ही ओरिसा

26 नोव्हेंबर    2104 एमव्हीएन शंकर.आध्रप्रभा  आंध्रप्रदेश,

8 जून             2015 जगेंद्रसिंग फ्रिलान्स,शहाजहांपूर युपी

20 जून           2015 संदीप कोठारी,फ्रिलान्स मध्यप्रदेश

महाराष्ट्रात 1985 मध्ये तरूण भारतचे पांचगणीच्या वार्ताहराची हत्त्या झाली होती त्या घटनेनं त्याकाळात मोठीच खळबळ उडाली होती.1985 नंतर महाराष्ट्रात 19 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या.मात्र या घटनांतील फारच थोडे आरोपी सापडले आणि त्यांना शिक्षा झाली. महाराष्ट्रात 2013 पासूनच आजपर्यत 195 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.तर  गेल्या 10वर्षातील ही संख्या 800 वर आहे.

 

Related Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,948FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...

पता है? आखीर माहौल क्यू बदला?

पता है? आखीर माहौल क्यू बदला? अचानक असं काय घडलं की, सगळ्यांनाच पत्रकारांचा पुळका आला? बघा दुपारनंतर आठ - दहा नेत्यांनी पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून...
error: Content is protected !!