अलिबाग पालिका दीडशे वर्षांची झाली

0
682

अलिबाग- अलिबाग नगरपालिकेला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्यानं नगरपालिकेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून 25 ते 28 डिसेंबर या काळात शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी अलिबाग फेस्टीवल साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.फे स्टीव्हलचे उद्दघाटन ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास आमदार सुभाष पाटील जिल्हाधिकारी सुमंत भांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या काळात विविध मनोरंजनात्मक आणि वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here