अलिबागची ओळख असलेला पांढरा कांदा यापुढे पनवेलच्या रहिवाश्यांना थेट उपलब्ध होणार आहे.औषधीगुणांनीयुक्त हा कांदा थेट उपलब्ध होणार असल्याने तो स्वस्तही मिळणार आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत्या माध्यमाूतन थेट विर्की सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे.या योजनेतून अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा तसेच तोंडली,कारले,वांगी,दुधी,शेवगा,आणि वाल आणि अन्य भाजीपाला थेट पनवेल आणि नवी मुंबईतील जनतेला उपलब्ध होणार आहे.शेतकरी गटांच्या माध्यमातून ही योजना कायान्वित केली जात आहे. त्यामुळे दलाला कडून शेतकऱ्यांची होणारी लुट आणि पिळवणूक थांबणार आहे.त्यासाठी पनवेल येथील 53 हौसिंग सोसायटयांशी प्राथमिक चर्चा झाली आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी अलिबाग तालुक्यातील 71 शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे.या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे.