आमचे मित्र आणि ज्ेयष्ठ पत्रकार अरूण खोरे “लोकशाहीसाठी समंजस संवाद” नावाचं एक चांगलं मासिक पुण्यातून काढतात.प्रचलित विषयांवरील वाचनीय मजकूर,उत्कृष्ट मांडणी, वैचारिक बांधिकली जपणारा हा अंक मुद्दाम वाचावा असा असतो.अरूण खोरे हे पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल नेहमीच नेहमीच तळमळीनं बोलतात..आमच्या चळवळीचे ते केवळ हितचिंतकच आहेत असं नाही तर चळवळीला करता येईल त्या पध्दतीनं मदत करीत असतात.त्यांनी समंजस संवादचा ताजा अंक पत्रकारांच्या प्रश्नांवरच काढला आहे.विशेषतः पत्रकारांवरील वाढत्या हल्लयावरचा मजकूर त्यांनी जाणीवपूर्वक छापला आहे.अरूण खोरे यांनीही या विषयावर एक सविस्तर लेख लिहिला आहे.R>”लोकशाहीचा चौथा स्तंभ निष्प्रभ कऱण्याचा प्रयत्न” कसा सुरू आहे याचं विश्लेषण त्यांच्या लेखात केलेलं आहे.एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांचा लेखही वाचनीय आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने गेल्या चार वर्षात केलेल्या आंदोलनाची माहिती देणारा मजकूरही अंकात आहे.थोडक्यात पत्रकार चळवळीबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांनी केवळ वाचलाच पाहिजे नव्हे संग्रही ठेवला पाहिजे असा हा अंक आहे.अरूण खोरेजी धन्यवाद.-