अमेरिकेच्या पत्रकाराचे शिरकाण

0
720
अमेरिकेचा पत्रकार जेम्स फोली याचं शिरकाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ इराकमधील ISIS ने सोशल मिडियावर टाकला आहे. या व्हिडिओच्या अखेरीस आणखी एका पत्रकाराला पकडल्याचे त्यांनी दाखवले आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढील निर्णयावर त्याचं जीवन अवलंबून असेल अशी धमकी ISIS ने दिली आहे.

‘अ मेसेज टू अमेरिका’ अशा नावाने हा व्हिडिओ आहे. ‘इराकमध्ये आयएसआयच्या ठिकाणांवर अमेरिकेने हवाई हल्ले केलेत. या हल्ल्यांमध्ये अनेक जण ठार झालेत. आयएसआयवर अशाच प्रकारे हल्ले सुरू ठेवल्यास अमेरिकेच्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात बुडवू, हे ओबामांनी लक्षात घ्यावं’, अशी धमकी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी व्हिडिओतून दिली आहे. या धमकीनंतर पत्रकार फोलीचं शिकराण करण्यात आलंय.

अमेरिकेचा ४० वर्षीय पत्रकार फोली याचं २२ नोव्हेंबर २०१२ मध्ये सिरियात अपहरण करण्यात आलं होतं. बोस्टनमधील ऑनलाइन बेवसाइट गोबलपोस्टने दिलेल्या माहितीनुसार फोली हा पत्रकारितेत फ्रिलान्सिंग करत होता. आखाती देशांमध्ये त्याने पाच वर्ष रिपोर्टींग केलं होतं. त्यात त्याचं एकदा अपहरण होऊन लिबियामध्ये सुटकाही करण्यात आली होती.व्हिडिओच्या अखेरीस अमेरिकेचा आणखी एक पत्रकार दिसून येतोय. त्याचं नाव स्टिव्हेन सोटलॉफ आहे. सिरियामध्ये जुलै २०१३ ला त्याचं अपहणर करण्यात आलंय. तो टाइमसह इतर माध्यम संस्थांसाठी काम करतो.’पत्रकार फोलीला ठार मारतानाचा आयएसआयएसचा व्हिडिओ आम्ही बघितलाय. व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी गुप्तचर यंत्रणा करताहेत. आणि हा व्हिडिओ खरा असेल तर आम्ही फोलीचे कुटुंबीय आणि त्याच्या मित्रांच्या दुखात सहभागी आहोत’, असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या केटलीन हेडन यांनी सांगितलं.

‘फोलीला ठार मारतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो खरा आहे की नाही याची माहिती सर्वांनाच हवी आहे. पण आपण सर्वांनी संयम बाळगावा. आणि फोलीपासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी’, असं फोलीच्या कुटुंबीयांनी ट्विट करून सांगितलंय. (मटावरून साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here