अमित शङा यांच्याविरोधातला लेख डीएनएने वेबसाईटवरून हटविला

0
1327

पत्रकारांचा आवाज दडपविण्याचे किती आणि कशा पातळीवर प्रयत्न होतात याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.प्रसिध्द पत्रकार राणा अय्यूब यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शङा यांच्या विरोधात एक टीकात्मक लेख लिहिला होता.तो डीएनए या इंग्रजी दैनिकात शुक्रवारी प्रसिद्ध झाला.  a new low in indian politics असं या लेखाचं शिर्षक होतं.मात्र हा लेख अंकात प्रसिध्द झाल्यानंतर डाएनएच्या वेबसाईटवरून हडविला गेला.लेख वेबसाईटवरून का काढला गेला याचं कोणतंही समाधानकारक उत्तर राणा याना दिलं गेलं नाही.माझा लेख अशा पध्दतीनं काढण्याचा डीएनला कोणताही अधिकार नाही अशा आशयाचं ट्विटही राणा यांनी केल आहे.मात्र व्यवस्थापनाकडून आलेल्या आदेशानंतर हा लेख साईटवरून हडविला गेल्याचंंंंंंंं सांगितलं जात आहे.लेखाचं शिर्षक कठोर आहे असंही कारण सांगितलं गेलं आहे.मात्र भाजपमध्ये आता कोणालीही विरोधातला सूर व्यक्त झालेला चालत नाही.विरोधी आवाज बंद कऱण्याचा वृत्तपत्र किंवा वाहिन्याच्या व्यवस्थापनावर दबाव आणून प्रयत्न होतो हे समोर आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here