‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनियंत्रित समजणे चुकीचे..’

0
960

‘एन.डी.टीव्ही’ कारवाई संदर्भात उज्ज्वल निकम यांचे मत

पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावरील वार्तांकनाच्या संदर्भात केंद्रीय माहिती व प्रसार मंत्रालयाने एन.डी.टीव्ही वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनियंत्रित आहे असे कुणी समजत असेल तर ते चुकीचे आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांनी ८१व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात उज्जव निकम यांनी हे मत मांडले.

उज्जल निकम म्हणाले, ‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य प्रसारमाध्यमांना असले तरी त्यांनी ते अनियंत्रित असल्याचे समजू नये. पत्रकारितेत सकारात्मक दृष्टी हवी. सतत नकारात्मक घंटा बडवीत बसवू नये. भोपाळच्या कारागृहातून कैदी पळाले तेव्हा एका राजकारण्याने ट्वीट केले की, िहदू  कैदी का पळून जात नाहीत. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याला जातपात, धर्म नसतो. समाजात दुही पडेल, अशा कृत्यास प्रसारमाध्यमांनी बळी पडता कामा नये. राजकारणी किवा अन्य कुणी मंडळी चुकीचे कृत्य करत असेल तर पत्रकारानी त्याबद्दल अवश्य लिहावे. कोणत्या वृत्तास प्रसिद्धी द्यावी याचे स्वनियंत्रण पत्रकारानी घालून घेतले पाहिजे. पत्रकारिता हा धर्म असून त्याचा धंदा होऊ देऊ नका, असे आचार्य म्हणत, असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार कैलास गोरटय़ांल आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवरांनी देशमुख यांच्या गौरवपर भाषणे केली. देशमुख यांना संयोजन समितीच्या वतीने ८१ हजार रुपयांची थली देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्यावरील गौरवग्रंथाचे  या वेळी प्रकाशन करण्यात आले.

या वेळी माजी मंत्री शंकरराव राख , माजी आमदार अरिवदराव चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष राजेश राऊत आदींची उपस्थिती होती.

लोकसत्तावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here