स्लोगन आज तक वरून उचलले?

0
812

अबकी बार मोदी सरकार ही भाजपच्या जाहिरातीतील कॅच लाईन आज सर्वतोमुखी झाली असली तरी ती भाजपने आज तकच्या एका कार्यक्रमातून उचलली असल्याचा आरोप आजतकमधील एक पत्रकार विकास मिश्र यांनी आपल्या वॉलवर केला आहे.

विकासच्या म्हणण्यानुसार,25 जानेवारी रोजी एका पाहणीच्या आधारावर आजतकने एक कार्यक्रम केला होता.त्याचं शिर्षक होतं अबकी बार मोदी सरकार. ?.त्यानंतर एका महिन्यानं भाजपनं हेच स्लोगन उचलंलं.मुळ स्लोगनमध्ये अब की बार मोदी सरकार च्या समोर प्रश्नार्थक चिन्ह होतं.भाजपऩं फक्त ते हटवलं.विकासचं म्हणणंय की,हा कार्यक्रम मीच केला होता आणि कार्यक्रमास नाव देखील मीच दिलेलं होतं.बीजेपीवर रॉयल्टीचा दावा ठोकला पाहिजे असा आग्रह आता सर्व मित्र करीत असल्याचंही विकासनं म्हटलं आहे.आपल्या दाव्याच्या पुष्ठर्य्थ त्यांनी मूळ कार्यक्रमाचा फोटोही दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here