देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला.त्यासाठी दीर्घकाळ निजामाच्या रझाकारांशी मराठवाड्यातील जनतेला निकराचा संघर्ष करावा लागला.या लढ्यात अनेकांना हौातात्म्य मिळाले.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला मराठवाडा मुक्ती संग्राम देशाच्या इतिहासातील एक दैदीप्यमान लढा आहे.दुदै्रवानं मराठवाड्यासारखीच मराठवाडा मुक्ती संग्रामाची देखील उपेक्षाच झाली.
मराठवाड्याला निजामाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं सर्वस्वाचं बलिदान केलं त्यासर्व वीरांना आमचे विनम्र अभिवादन..
आम्हाला अभिमान आहे आमच्या स्वातंत्र्यवीरांचा…
मराठवाडा मुक्ती दिनाच्या सर्व जनतेस लाख लाख शुभेच्छा