अनिल मेघेंच्या निधनाने परिषदेची मोठी हानी.

0
860

वर्धा येथील ‘प्रतापगडचे वारे’ या दैनिकाचे संपादक,मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय चिटणीस तसेच परिषदेवर जिवापाड  प्रेम करणारे माझे मित्र अनिल मेघे यांचे निधन झाल्याची बातमी परिषदेच्या सर्व सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळावा अशी आहे.काही दिवसांपुर्वी माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते.आज त्यांच्या निधनाची बातमी अंगावर येऊन आदळली आणि  प्रचंड धक्का बसला.मराठी पत्रकार परिषद आज लोकप्रियतेच्या शिखरावर असली तरी त्यामागे अनिल मेघे यांच्या सारख्यां अनेक पत्रकारांचे योगदान आहे हे आम्हाला विसरता येणार नाही.मेघें परिषदेच्या संपर्कात आले आणि ते कायम परिषदेबरोबरच राहिले.प्रसंगी अनेक मुद्यांवर जरूर मतभेद झाले पण त्यांनी परिषदेची कधी प्रतारणा केली नाही.विदर्भात परिषदेचे काम वाढविण्यामध्ये मेघे याचा मोठा हात आहे हे नाकराता येणार नाही.किंबहुना अनेक वर्षे मेघे हेच विदर्भातील परिषदेचा चेहरा होते.ते परिषदेचे विभागीय सचिव होते,अधिस्वीकृती समितीचे दोन-तीन वेळा सदस्य होते,तसेच परिषदेचे प्रतिनिधी म्हणूनही त्यानी वेगवेगळ्या सरकारी कमिट्यांवर काम केले होते.त्यामुळं परिषद आणि मेघ हे एक घट्ट नातं निर्माण झालं होतं.महाराष्ट्रातील पत्रकारांची अनेक घराणी अशी आहेत की,तीन-तीन पिढया ती कुटुंबं परिषदेबरोबर आहेत.मेघेंबाबत अशीच स्थिती होती.अनेक संघटना आल्या गेल्या,पण मेघेंनी कधी आपल्या निष्ठा बदलल्या नाहीत.त्यामुळंच मेघेचे असं अकाली जाणं परिषदेवर मोठा आघात करणारं आहे यात शकाच नाही.परिषद नव्या उंचीवर जात असताना  हे सारं पाहण्यासाठी मेघे आज आमच्याबरोबर हवे होते .त्यांच्या निधनानं सारी परिषद शोकविव्हळ आहे.मेघे यांना विनम्र अभिवादन.त्यांच्या परिवाराच्या दुःखात परिषद आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकार सहभागी आहोत.

पत्रकारांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे असं मी वारंवार सांगतो.गेल्या नऊ महिन्यात आपले किमान 10 सहकारी असे अचानक सोडून गेले आहेत.हे प्रमाण वाढत आहे.हे चिंताजनक आहे.त्यामुळंच येत्या 3 डिसेंबर रोजी राज्यभर आपण पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.हा कार्यक्रम राज्यात सर्वत्र यशस्वी कऱणे हीच खरी अनिल मेघे यांना श्रध्धांजली ठरेल.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here