अध्यक्षपदी कृष्णा शेवडीकर

0
796
महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदी कृष्णा शेवडीकर
कार्याध्यक्षपदी जालन्याचे रमेश खोत
नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदी
नांदेडच्या दैनिक श्रमिक एकजूटचे संपादक कृष्णा शेवडीकर यांची तर
कार्याध्यक्षपदी दैनिक मत्स्योदरीचे रमेश खोत यांची सर्वानुमते निवड
करण्यात आली.
मुंबई येथे नुकतीच महाराष्ट्र संपादक परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली
होती. या बैठकीमध्ये परिषदेचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार,
विचारवंत, दलित मित्र स्व. यशवंत पाध्ये यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात
आली. यानंतर कार्यकारिणीच्या अन्य पदाधिकार्‍यांचीही निवड करण्यात आली.
यामध्ये उपाध्यक्षपदी प्रकाश कुलथे व गजानन चव्हाण, सचिवपदी एकनाथ
बिरवटकर (ठाणे), कोषाध्यक्ष अनंत यशवंत पाध्ये (मुंबई), यांच्यासह
कार्यकारी सदस्य म्हणून दै. पुण्यनगरी मुंबईचे संपादक संजय मलमे, सुधीर
जाधव, बाळा साळुंखे, सौ. शारदादेवी चव्हाण (संगमनेर) यांची निवड करण्यात
आली.स्व. यशवंत पाध्ये यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र संपादक परिषद ही
पत्रकारांच्या प्रश्‍नांवर गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या
प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे काम स्व. पाध्ये यांनी केले आहे.
त्यांच्याच विचाराने प्रेरीत होवून त्यांनी घालून दिलेला आदर्श यापुढील
काळातही जोपासला जाईल. अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा शेवडीकर
यांनी यावेळी बोलताना दिली.या निवडीबद्दल त्यांचे संपादक परिषदेचे नितीन
धुत, हेमंत कौसडीकर, रमेश गोळेगांवकर, विजय दगडू, रामनारायण डागा, शेख
इफ्तेखार, दिलीप माने, धाराजी भुसारे, विजयकुमार मुंंदडा, डॉ.धनाजी
चव्हाण, दिलीप दिक्षीत, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अशोक कुटे,
प्रदेश प्रतिनिधी प्रा.सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष प्रविण देशपांडे,
कोषाध्यक्ष सुरज कदम, सरचिटणीस राजकुमार हट्टेकर, मार्गदर्शक आसाराम
लोमटे, मोहन धारासुरकर, शरद सुपेकर, सुभाष कच्छवे, बालाजी देवके, मंचक
खंदारे, विठ्ठलराव वडकूते,चंद्रकांत भुजबळ आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here