chavan 1

मराठी पत्रकार परिषदेच्या सchavan2ततच्या  पाठपुराव्यामुळे सरकारने अखेर आज शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या योजनेचा लाभ आता अधिस्वीकृतीधारक पत्रकाराप्रमाणेच त्याची पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांनाही देण्याचे मान्य केले आहे..तशा अर्थाचा शासनादेश
( जीआऱ) सरकारने आज काढल्याने याचा फायदा राज्यातील जवळपास दोन हजार अधिस्वीकृतीधारकांच्या कुटुंबियांना होणार आहे.

पत्रकारास दुर्धर आजार झाल्यास किंवा त्याचे आकस्मिक निधन झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियास मदत करण्याच्या उद्देशानं शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापन करण्यात आली .त्यामध्ये आरंभी दोन कोटी रूपये ठेव ठेवण्यात आली होती.नंतर या रक्कमेत वाढ करून ती पाच कोटी करण्यात आली आणि अलिकडेच तो निधी दुप्पट म्हणजे दहा कोटी रूपये करण्यात आला आहे.राष्ट्रीय बॅकेत ठेवलेल्या  या रक्कमेच्या व्याजातून राज्यातील गरजू पत्रकारांना मदत दिली जात होती,यामध्ये आता अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेली त्यांची पत्नी तसेच मुलांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.( कोणत्या आजारास मदत मिळू शकेल याची माहिती आणि मदत मिळण्याची कार्यपध्दती याची माहिती दिनांक 17 ऑक्टोबर 2011 आणि 1 ऑक्टोबर 2013 च्या शासनादेशात स्पष्ट करण्यात आले आहेत ) या संबंधीचा जीआर (क्रमांक मावज 2016/प्र.क्र.188/ का 34) आज काढण्यात आला असून नव्या नियमांची अंमलबजावणी देखील आजपासून सुरू केली गेली आहे

आमच्या मागण्या

शासनाने आज अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या कुटुंबियांनाही मदत देण्याचे धोऱण जाहीर करून परिषदेची मागणी मान्य केली असली तरी या संदर्भातल्या दोन मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत.त्यात शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचा लाभ ज्यांची उपजिविका पत्रकारितेवर अवलंबून आहे अशा सर्व पत्रकारांना मिळावा अशी परिषदेची मागणी आहे.शिवाय ठराविक म्हणजे केवळ 22 आजारांनाच या निधीतून मदत मिळते या नियमात बदल करून ही मदत सर्व प्रकारच्या आजारांसाठी दिली जावी ही परिषदेची मागणी आहे.सरकारने त्यादृष्टीने विचार करावा अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सासकीय रूग्णालयातून यापुर्वीच विनामुल्य सवलत दिली जाते ( 25-10-2009 रोजीचा जीआर पहा) तसेच महात्मा गांधी जन आरोग्य योजनेत देखील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचा समावेश कऱण्यात आला आहे ( त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा जीआर 04-08-2016 रोजी निघालेला आहे ) त्याचबरोबर आता शंकरराव चव्हाण कल्याण निधीची सवलत पत्रकाराच्या कुटुंबियांना मिळणर असल्याने त्याचा लाभ होणार आहे.सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.

LEAVE A REPLY