अखेर गुन्हा दाखल..

0
402


चाकूर येथील पत्रकार विकास स्वामी यांच्या कार्यालयासमोर धुडगूस घालून त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणारया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर काल गुन्हा दाखल करण्यात आला..
गेली सहा दिवस पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत होते.. मात्र अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने गुन्हा दाखल न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस सरळ झाले.. या संबंधीच्या पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या निषेधाचा पाऊस पडला.. यातून “स्वामी एकटे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी असल्याचा” संदेश पोलिसांपर्यत पोहोचला… पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.. पत्रकारांच्या एक जुटीचा हा विजय आहे..
स्वामी यांना साथ देणारया चाकूरच्या आणि राज्यातील सर्व पत्रकार मित्रांचे अभिनंंदन

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here